Saturday, November 27, 2010

कसाब भाईना खत

श्रद्धांजली...
दोन वर्षांपूर्वी देशावर झालेल्या हल्ल्यात जीव गमावणा-या निरपराधांना आदरपूर्वक श्रद्धांजली... पुढील लेख (पत्र) हे कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने लिहिले गेले नसून, दुखावलेल्या भावना व्यक्त करण्याच्या हेतूने कागदावर उतरले आहे. देशाची अब्रू चव्हाट्यावर आणणा-या भ्रष्ट राजकारण्यांना शाब्दिक चपराक देण्याचा हा एक निष्फळ प्रयत्न आहे. त्या अब्रूची निंदा हल्लेखोर कशावरून करत नसतील???


----------------------------------------------------------------------------------------------------

                                                                      कसाब भाईना खत
वालेकुम अस्सलाम कसाब भाई,                                                                                नोव्हेंबर २६, २०१०

तुमची सगळी खैरीयत रहावी, यासाठी अल्लाकडे नमाज अदा केली आणि हे खत लिहायला बसलो. तशी तुमच्या खैरीयतीसाठी अल्लामियांसकट कोणीही फिकर करण्याची जरूरत नाही, याची आम्हाला जानकारी आहेच. एवढंच काय, आम्हाला तुमचा हेवाही वाटतो. आपण घडवून आणलेल्या हल्ल्याला आज दोन सालं पूर्ण झाली. गिरफ्तार होऊनही आपण आज सहीसलामत जिंदा तर आहातच; पण काफरांनी चालवलेली तुमची खातरदारी पाहून होणारी खुषी आम्ही शब्दांत नाही मांडू शकत.

तुम्ही अल्लाला अदा केलेला जिहाद त्याने मंजूर केल्याचीच ही निशाणी आहे. आजही आम्हाला तुमचं बचपन चांगलंच याद आहे. ज्या वयात हिंदुस्थानातील पोरं भविष्याची चिंता करत पढाईत वक्त जाया करतात, ज्या वयात अमेरिकेतली गोरी औलादं लौन्ढीयांच्या पाठीमागे शेपट्या घालतात, त्याच वयात तुम्ही नेक इराद्यांनी बंदुकी हाताळत होतात. त्या पर्वर्दीगाराची लाजवाब करामतच आहात तुम्ही. तुमच्यातली ही होशियारी आम्ही खूप आधीच हेरून ठेवली होती.

सचमे, समिन्दराच्या वाटेनं दोन महिने प्रवास करून त्या नापाक धर्तीपर्यंत जाणं, किती जिकिरीचं राहिलं असेल, याची आम्ही कल्पना करू शकतो. पण अल्लाच्या बंद्याला डर कसचं? मुंबैच्या त्या रेल्वे स्टेशनवरची सी.सी.टीव्ही.वर दिसलेली तुमची आत्मविश्वासभरी चाल सगळं काही बोलून गेली. बेछूट गोळीबार करत सुरु असलेली तुमची दौड पाकच्या भूमीवरची तुमची मोहोब्बतच दाखवून देत होती. गिरफ्तार होण्यापेक्षा मोक्षाचा मार्ग स्वीकारणं, तुम्ही पसंत केलं असतं, याची आम्हाला जाणीव आहेच. काफिरांच्या कत्तलीनेच आपल्याला जन्नत प्राप्त होते, हे सर्वात मोठं सच आहे. पण त्या जन्नतीपेक्षाही जादा अमिरी तुम्ही अनुभवता आहात. दर महिन्याला दोन करोड रुपये हिंदूस्थानी हुकुमत तुमच्या सुरक्षिततेसाठी खर्च करते, असं आम्ही ऐकून आहोत. कोण्या हवालदाराला परवा तुम्ही लगावलेली थप्पडही ऐकली आम्ही. तुमच्या या काबिलीयतीला आमचा बारबार सलाम!

खुलेआम सडकांवरून जरी तुम्ही तुमची दहशत गाजवू शकत नसलात, तरी कोर्टातला तुमचा गुरुर, तिथल्या हुकुमतीशी वागण्यातला तुमचा जुनून इन्शाल्ला आपल्या येणा-या नसलांसाठी आदर्श ठरत आहे. त्या पाटील आणि खडसेला दिलेलं तुमचं जवाब बेशक काबिले-तारीफ होतं. दोन सालं गुजरली, तरी तुम्हाला तुमच्या करतूतीचा पछतावा नाही, याची जाणीव तरी हिंदूस्थानला झाली! मागेच खरंतर त्या रामूनी तुमच्या जिंदगीवर फिल्म काढली असती; पण थोडक्यात माशी शिंकली. तसा, इतिहास गवाह आहे... काफरांची याददाज कमजोरच आहे जराशी! थोडेच दिवसात ते सगळं भूलून जातील. चाचा अफझल गुरूना सध्या कोणी गाली तरी देतं का? तसेच लोक तुम्हालाही भूलतील. कदाचित हुकुमतीने नेमलेले वकील, उज्ज्वल निकम, केस तुमच्या खातीर जिंकतीलही!

आम्ही इथे त्या वक्ताचा इंतजार करत आहोत. तुमच्या कदमांवर कदम ठेवू पाहणारे काफी नौजवान इथे बंदुका चालवायला शिकत आहेत. तुम्ही स्वत: त्यांना मार्गदर्शन करू शकाल, अशी अल्लाकडे प्रार्थना करतो. बाकी, मुंबईत याही वेळी आवामने दिये लावले; फुलं चढवली; आणि अशाच काही हरकती केल्या. काहींनी आसू ढाळले... तर काहींचे तेही सुकले होते. लेकीन, या सगळ्याचा आपल्या इराद्यांवर कोणताही असर होण्याचा सवालच येत नाही. जिहाद हाच मोक्षाचा मार्ग आहे. आणि तोच आपल्याला जन्नतीपर्यंत पोहोचवेल.

तुमच्या या कर्तबगिरीची मिसाल म्हणून आज संध्याकाळी इकठ्ठा नमाज ठेवली आहे. तीही अल्ला मंजूर करेल, अशी अशा करतो.

इंतकामची आग अशीच भडकत राहू द्यात. अगल्या साली, तुम्हीही या नमाजीत सामील व्हाल, हीच ख्वाईश...

खुदा हाफिज,
अब्दुल रहमान काझी
('अब्दुल रहमान काझी' हे नाव पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध लावला जाऊ नये. तसा तो प्रवृत्तीशी लावला जाऊ शकतो.)
(Credits: www.sbs.com for the only image in the post.)

11 comments:

  1. सहीच मियां !! जबरी लिहिलं आहात.

    रच्याक, सुरुवातीच्या सूचनेची आवश्यकता नव्हती असं माझं मत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांच्या आयचा घो !!!!!!!

    ReplyDelete
  2. Ek number lihila ahes...Durdaiv apal ki he asale haram ani bhadawe rajakarni milale aplyala.

    26 Nov 2008 la shahid zalelyana salam

    ReplyDelete
  3. हेरंब आणि अमित,
    धन्यवाद.
    गुजरातला खंबीर नेतृत्व मिळालं आणि गुजरात घडला. तिथे जाऊन आलो ना, तर कायापालट कळतो अक्षरश:.
    बिहारलाही प्रगतीची आस लागल्याचं दिसतंय. नितीश कुमारांनी केलेल्या चांगल्या कामापेक्षा, ते बेअक्कल बिहारी लोकांपर्यंत पोहोचल्याच मला अधिक महत्त्वाचं वाटतं.
    बदल होतील, अशी आशा धरू.
    - शेखर

    ReplyDelete
  4. तुकाराम ओंबळेंकडे काठी होती म्हणून कसाब जिवंत राहीला. नाहीतर हा विषयच मिळाला नसता चर्चेला. शासनव्यवस्थेकडून सध्या चालू आहे त्या पेक्षा वेगळे काही अपेक्षित नाही. दहशतवादी आणि पाकीटमार लोकांचे खटले सारख्याच कायद्याने चालवले जातात. कशाला द्यायची संधी सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात जायची आणि तिथून सर्वोच्च आणि मग राष्ट्रपती. एकाच सुनावणीत खटला निकाली काढला तर कोणाच्या पोटावर पाय येणार आहे समजत नाही.

    अभिजित...

    ReplyDelete
  5. धन्यवाद अरुंधती...
    अभिजित,
    खरं आहे.

    ReplyDelete
  6. Seven salutes to Shekhar. Everyone feels about such issue but no body writes for the same.

    +1 Heramb

    Keep writing on blog.

    ReplyDelete
  7. khup chaan lihile ahes... bhasha ani shabdanchi niwad aggdi mastt keli ahes.. asach likhanacha pravaas suru rahude :)

    ReplyDelete
  8. Nakki Sneha.
    Ase vaachak asteel, tar kaa naahi! :-)

    ReplyDelete
  9. - दर्शना राजेश चौधरी.September 13, 2012 at 12:55 PM

    नमस्कार शेखर,
    आताच तुमचा हा ब्लॉग पोस्ट वाचला, अंमळ उशिरानंच (खरंतर बऱ्यापैकी उशिरानं ) वाचला,प्रकाश सरांकडून लिंक मिळाली, खूप छान लिहिलं आहे,
    ह्या भयानक( आणि लाजिरवाण्या...कसाब अजूनही जिवंत आहे..) प्रकरणाला ४ वर्ष झाली तरी परिस्थिती जैसे थे.अजून काय माहित किती दिवस (महिने...वर्ष !!) हा खर्च आपल्या खिशातून चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फाशीची शिक्षा कायम ठेवल्याने प्रकरणाला थोडी गती मिळाली आहे( असे वाटते ), आता बघूया किती दिवस टिकते. असो, तुमचा ब्लॉग खरंच छान आहे...(लवकरात लवकर सगळे पोस्ट वाचायचे आहेत ...)

    ReplyDelete